Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात

खा. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

नवी दिल्ली ः पंतप्रधान कधीच एका राजकीय पक्षाचे नसतात, तर ते संपूर्ण देशाचे असतात. त्यामुळे या पदावर असणार्‍या व्यक्तीनी गांभीर्याने बोलण्याची गरज

सरकारला किंमत मोजावी लागेल
नागपूर विधानभवनावर धडकणार राष्ट्रवादीचा मोर्चा
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा

नवी दिल्ली ः पंतप्रधान कधीच एका राजकीय पक्षाचे नसतात, तर ते संपूर्ण देशाचे असतात. त्यामुळे या पदावर असणार्‍या व्यक्तीनी गांभीर्याने बोलण्याची गरज आहे. कारण पंडित नेहरू यांनी देशासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मात्र आज ज्या प्रकारे राज्यसभेत नेहरूंवर टीका केली ती देशाच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे. ती वेदना देणारी असल्याची टीका खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली. ते राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या युवकांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
लोकशाहीत आपल्या अधिकार मजबूत ठेवण्याचा अधिकार आहे. जेव्हा चूकीचे काही होत असेल तर त्याला चूक म्हटलेच पाहिजे. चुकीचे काम करणार्‍यांविरोधात लढले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका युवकाने प्रश्‍न केला होता की, आम्ही युवकांनी राजकारणात यावे की नाही, आजची परिस्थिती पाहता. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले. देशाच्या विकासासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी योगदान दिले. त्यांचे योगदान तुम्हाला विसरता कामा नये, तंत्रज्ञान, शेती सह देशाला सर्वच क्षेत्रात पुढे आणण्याचे काम पंडीत नेहरू यांनी केले. ज्यांनी देशासाठी योगदान दिले. अशा लोकांविरोधात सद्याच्या पंतप्रधानांनी आगपागड काढणे हे चुकीचे आहे. हे वेदनादायी आहे, असे म्हणत त्यांनी मोदींविरोधात नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान देशाचे असतात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दिवंगत नेत्यांवर टीका योग्य नसल्याचे खडे बोल शरद पवार यांनी पीएम मोदींना सुनावले. जवाहरलाल नेहरू यांचे प्रत्येकाचे देशासाठी विकासात योगदान आहे. मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

पक्ष आणि चिन्हावर भाष्य करणे टाळले – राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा ताबा अजित पवारांकडे गेल्यानंतर खासदार शरद पवार केंद्रीय निवडणूक आयोगावर किंवा अजित पवार गटावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी यावर बोलणे टाळले. तसेच यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी नो कमेंट म्हणत उत्तर देणे टाळले आहे. त्यांनी युवकांशी संवाद साधला. युवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देत त्यांचे समाधान केले.

COMMENTS