Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वय काढू नका, हा गडी थांबणार नाही

खासदार शरद पवारांचा विरोधकांना थेट इशारा

बारामती ः काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? लोक निवडून कुणी आणले? मंत्रिपदे कुणी दिली? माझे वय काढ

राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट

बारामती ः काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? लोक निवडून कुणी आणले? मंत्रिपदे कुणी दिली? माझे वय काढू नका, मी थांबणारा गडी नाही असा सज्जड इशाराच खासदार शरद पवार यांनी विरोधकांना दिला आहे. बारामतीतल्या उंडवडी येथील सभेत शरद पवारांनी विरोधकांसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, तुम्ही माझे वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिलंय. हा गडी थांबणारा नाही. मी शेवटच्या श्‍वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संकटकाळात साथ देणार्‍यांना केव्हाही वार्‍यावर सोडणार नसल्याचीही ग्वाही दिली. शरद पवार सध्या बारामतीच्या दुष्काळी दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी उंडवडी पठार येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्या वयावर टीका करणार्‍या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मी कृषीमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला प्रचंड मदत केली. त्यावेळी मी ते कोणत्या पक्षाचे आहेत हे बघितले नाही. ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवढेच मी पाहिले आणि त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे हे धोरण राबवले. मागे नरेंद्र मोदी यांनी बारामतीला येण्याची इच्छा व्यक्त केली. इथे आल्यानंतर त्यांनी मी त्यांना बोट धरून शिकवल्याचे सांगितले. आज तेच पंतप्रधान वेगळी भूमिका घेत आहेत. विशेषतः एखाद्याने वेगळी भूमिका घेतली, तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर टीका केली. त्यांनाही आज तुरुंगात टाकण्यात आले, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला. शरद पवारांनी यावेळी आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही कौतुक केले. भाजप हा मग्रुर पक्ष आहे. सध्याची निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील नाही. ही लढाई स्थानिक प्रश्‍नांवरील आहे. पण आता ही लढाई घरगुती झाली आहे. सुप्रिया सुळे ही माझी मुलगी आहे. तिने संसदेत जोरदार कामगिरी केली आहे. देशातील पहिल्या 3 खासदारांत तिचे नाव आहे. तिची संसदेतील उपस्थितीही 90 टक्क्यांहून जास्त आहे, असेही शरद पवार यावेळी मतदारांना आपल्या मुलीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करताना म्हणाले.

COMMENTS