Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन 10 वंदे भारत रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

सोलापूर ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधी देशभरात विविध प्रकल्पांची पायाभरणी होत असून, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात व

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
‘त्या’ ८ चित्त्यांचं नामकरणं; मोदींनी ठेवलं खास नाव !
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास

सोलापूर ः लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधी देशभरात विविध प्रकल्पांची पायाभरणी होत असून, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात विविध ठिकाणी 85 हजार कोटींहून अधिक 6 हजार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. यासोबतच देशभरातील 10 वंदे भारत रेल्वे आणि इतर रेल्वे सेवांना पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सची पायाभरणी केली.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या उद्घाटनामध्ये 50 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे, 222 रेल्वे गुड्स शेड, 51 गति शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल, 2646 स्थानकांचे डिजिटल नियंत्रण, 35 रेल्वे कार्यशाळा-लोको शेड-पिटलाइन्स-कोचिंग डेपो, दुहेरीकरण-मल्टी-ट्रॅकिंग 50 किमी रेल्वे मार्ग, 1045 किमीच्या 80 रेल्वे लाईनवरील विभागांचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग, 35 रेल्वे कोच रेस्टॉरंट्स, 1500 हून अधिक एक स्टेशन एक उत्पादन स्टॉल, 975 सौर उर्जेवर चालणारी स्टेशन-सेवा इमारती, 2135 किमी रेल्वे लाईन विभागांचे विद्युतीकरण, 401 किमी न्यू खुर्जा- सनेहवाल ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, न्यू मकरपुरा-न्यू घोलवड वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभागाचा 244 किमी, अहमदाबाद येथे ऑपरेशन कंट्रोल सेंटर, फलटण-बारामती नवीन रेल्वे लाईन आणि 9 इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशनचे कामांचा समावेश आहे. यावेळी कलबुर्गी जिल्ह्याचे खासदार डॉ. उमेश जाधव यांनी कलबुर्गी स्थानकांवर कार्यक्रमाला उपस्थिती लावली, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी सोलापूर स्टेशनवरील कार्यक्रमाला उपस्थित होते, खासदार सुधाकर श्रंगारे यांनी लातूर कोच फॅक्टरी या सोहळ्याचे प्रास्ताविक केले.निरजकुमार डोहरे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर विभाग कलबुर्गी स्थानकावर झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या दहा वंदे भारत रेल्वे नव्याने सुरू- म्हैसूर-चेन्नई, लखनौ-देहराडून, कलबुर्गी-बेंगळुरू, रांची-वाराणसी, हजरत निजामुद्दीन-खजुराहो, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, न्यू-जलपाईगुडी-पाटणा, पाटणा-लखनौ, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल आणि भुवनेश्‍वर-विशाखापट्टणम या वंदे भारत रेल्वेंचा समावेश आहे. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी 4 वंदे भारत ट्रेनच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये अहमदाबाद-जामनगरला ओखापर्यंत, अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला चंदीगडपर्यंत, गोरखपूर – लखनौ प्रयागराज पर्यंत आणि तिरुअनंतपुरम-कासरगोड मंगळूरपर्यंतचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 506 प्रकल्पांचा समावेश – पंतप्रधान मोदींनी केलेल्या उद्धाटनामध्ये महाराष्ट्रातील 506 प्रकल्पांचा समावेश असून, यामध्ये 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलची पायाभरणी, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, 130 सोलर पॅनेल, 18 नवीन लाईन्स-लाइन्सचे दुहेरीकरण- गेज कन्व्हर्जन, 12 गुड्स शेड, 7 ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, 4 गती शक्ती टर्मिनल आणि 3 विद्युतीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे.  तसेच लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो,  लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे 5 जन औषधी केंद्रांचे उद्घाटन, नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे 4 रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटनांचा समावेश आहे.

COMMENTS