चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद

महाराष्ट्र राज्यात गेल्या महिनाभर सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सर्वाधिक चर्चेत आलेला सत्ता संघर्ष सध्याच्या सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांनाह

हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…

महाराष्ट्र राज्यात गेल्या महिनाभर सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सर्वाधिक चर्चेत आलेला सत्ता संघर्ष सध्याच्या सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांनाही आता सोसवेना झाला असल्याची वक्तव्ये भाजपच्या पदाधिकार्‍यांनी करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाबाबत वाईट वाटले आहे. मात्र, मनावर दगड ठेवून आज आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. तसेच यापुढे राज्यातील आगामी निवडणूकामध्ये चांगल्या प्रकारे काम करू या असे सुचवित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमधीत्त खदखद बोलता-बोलता व्यक्त केली. मात्र, फेसबुक या सोशल मिडियावर संबंधित प्रतिक्रिया शिंदे समर्थकांमध्ये वेगळा संदेश जाईल. म्हणून प्रतिक्रिया हटविण्यात आली आहे. यामुळे भविष्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भाजप काय निर्णय घेणार? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली जर व्यक्ती केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या मनावर ठेवलेला दगड किती दिवस तसाच राहणार अशी चर्चाही नागरिकामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपची शिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यानंतर उदयास आलेले महाविकास आघाडीचे सरकार ही एक राजकिय तडजोड होती. मात्र, यामुळे भाजपला महाराष्ट्रामध्ये विरोधकाच्या बँचवर बसण्याची वेळ आली होती. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रातील नेत्यांनी बर्‍याच यंत्रणा शोध मोहिमेवर रवाना केल्या होत्या. त्यातून अनेक सत्य उघडकिस आणू अशा प्रकारचे वातावरण निर्माण केल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान मंत्री व आमदारांनी विधान परिषदेचे मतदान केल्यानंतर सुरत व्हाया गुवाहाटी असा अज्ञातवासाचा प्रवास केला. त्यातून काय सिध्द झाले? सामान्य मतदाराला काय मिळाले? राज्यातील विकास कामास कशी चालना मिळाली? असे जर सवाल उपस्थित केले तर फक्त आणि फक्त निराशा असेच उत्तर मिळालेले आहे. आता जर सामान्य मतदाराने हे सर्व पाहून स्वत:च्या मनावर दगड ठेवला होता. तर मग सत्ताधारी पक्षात असूनही भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या मनावर जर दगड ठेवला म्हणून काय झाले? हिंदुत्वाचा नारा देत युती झालेल्या भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येवून सरकार सत्तेत आले होते. मात्र, सत्तेत असताना शिवसेनेच्या नेतृत्वाला ते काही अवडले नव्हते. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार सत्तेत आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नेत्यांनी सरकार पाडण्याचीच चर्चा सुरु होती. विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर काही आमदारांच्या इच्छेनुसार तर काहींना दम भरवून तर काहींना फसवून सुरत व्हाया गुवाहाटी नेण्यात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजप यशस्वी झाले. त्यातून नवीन सरकार येणे गरज असल्याचे भासवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, त्यानंतर सुरु झालेली न्यायालयीन लढाई एक डोकेदुखीच बनली आहे. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी केंद्रीय नेतृत्वाला सहज बोलता-बोलता टोचण्या देवू लागले आहेत. तशीच एक घटना पनवेल येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकित केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे वाईट वाटले. त्यामुळे मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे वक्तव्य केले. मात्र, त्यानंतर भाजपकडून सुरु झालेल्या सारवासारवीमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये सुरु असलेली खदखद मनावर ठेवलेल्या दगडापेक्षा कठीण असल्याचे पहावयास मिळू लागले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपर्यंत तरी सत्ताधारी पक्षातील शांतता कायम राहिल का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

COMMENTS