Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार

अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भोकर प्रतिनिधी - भारतीय जनता पक्षाचे भोकर तालुका सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार  अंगरवाड, सरपंच संघटनेचे तालुका उपा

शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक
रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू
 छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू

भोकर प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे भोकर तालुका सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार  अंगरवाड, सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोतराव अंगरवाड या दोघा बंधूंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला राम-राम करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत  काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील काँग्रेसचे संघटन आणखी बळकट होणार आहे.  
नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरुवार दि. 30 मार्च रोजी पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आ. अमरनाथ राजूरकर,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगांवकर, श्रावण रॅपणवाड, सुरेंद्र घोडजकर, नामदेवराव आईलवाड, तालुकाध्यक्ष जगदीश पा. भोसीकर, विनोद पा चिंचाळकर, रामचंद्र मुसळे, माधव आमृतवाड, गणेश राठोड यांची उपस्थिती होती. भोकर तालूका भाजपाचे सरचिटणीस तथा बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार अंगरवाड व त्यांचे बंधू सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष मारोती अंगरवाड, तंटामुक्तेी समितीचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख देवठाणकर, ग्रा.पं. सदस्य संजय उदगिरे, व्यंकट बत्तलवाड, अमरसिंग जाधव, बंकट जाधव, ज्ञानेश्वर गोदेवाड, पांडुरंग येदले, प्रेमसिंग जाधव, ओमप्रकाश शिंदे, शाम काळे, अनिल कहाळे, सुरेश बोईनवाड, रामजी राठोड यांच्यासह अनेकांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला. यावेळी देगलूरचे तालूकाध्यक्ष बळेगावकर, माजी उपाध्यक्ष प्रितम देशमुख, हरजिंदरसिंघ संधू, राजकमलसिंघ गाडीवाले, रावसाहेब देशमुख देवठाणकर, शिवाजी शिंदे, साहेबराव वाकोडे आदिंची उपस्थिती होती.

COMMENTS