Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई प्रतिनिधी - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

‘इलेक्ट्रीक पब्लिक ट्रान्सपोर्ट’ देशाला परवडणारे : नितीन गडकरी
महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू ? माजी खासदार किरीट सोमय्यांचा तो व्हिडिओ
पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 

मुंबई प्रतिनिधी – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात सर्व विरोधकांची मुठ बांधण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली आहे.  सावरकर मुद्द्यांवरुन ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घ्या, असा सल्ला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना दिला  आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत सावरकरांच्या वादाचा मुद्दा तसेच लोकसभा जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी कालच शरद पवार यांच्यासह बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली होती. आता राहुल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजपविरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीचे सरकारही स्थापन झाले. दोन वर्ष सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष होते. शिवसेनेत फूट पडली आणि सरकार कोसळले. त्यानंतर पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत ही आघाडी कायम राहिली. कसबा पेठ निवडणुकीत आघाडीने भाजपला दे धक्का देत जागा जिंकली. याच फॉर्म्युला भविष्यात कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक  भाग म्हणून देशात आघाडीचे प्रयत्न होत आहेत. उद्योगपती गौतम अदानी प्रकरणी जेसीपी चौकशीची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून ही मागणी योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मागणी योग्य राहिल असे म्हटले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानावरुन मागे हटत जेसीपीच्या मागणीला माझा विरोध नाही. तशी मागणी असेल तर जेसीपी चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्टीकरण पवार यांनी दिले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट झाली. यावेळी खरगे यांनी पवार यांचे हात हातात घेतले आहेत. राहुल गांधी आणि शरद पवारांमधील दुवा म्हणून खरगे भूमिका पार पाडताहेत, अशी चर्चा सुरु झालेय. सत्ताधारी भाजपविरोधात यूपीए बळकट करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार घेतला आहे. खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी, शरद पवारांची चर्चा झाली. तृणमूल, आप आणि समविचारी विरोधकांना सोबत घेण्याचा निर्णय यावेळी झाला. दरम्यान, त्याआधी  2024 च्या रणनीतीसाठी विरोधकांची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, विद्यामान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यंत्री तेजस्वी यादव यांची महत्त्वाची बैठक झाली. 2024 मध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. ही विचारांची लढाई आहे आणि सगळे एकत्र येऊन ही लढाई लढू असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

COMMENTS