Homeकृषी

ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती-पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
उमरीतील खत भेसळ तक्रारीची कृषी विभागाकडून तात्काळ दखलप्राथमिक तपासणीत वाळूची भेसळ आढळली नाही, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई
शेतकऱ्यांने टोकण यंत्राच्या साहाय्याने केली मका लागवड

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती-पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल्या आगीत 25 ते 30 एकर ऊस जळाला. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मलकापूर येथे गेल्या आठवड्यात परिसरात 20 एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानंतर आता ओगलेवाडी रेल्वे स्थानकाजवळ ऊसाच्या शेतातून धुराचे लोट दिसू लागले होते. धुराच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. तेंव्हा ऊस शेतीला आग लागल्याचे दिसून आले.
शेतात असलेल्या शेतकर्‍यांनी कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत शेतकर्‍यांनी बोअरींग व शेतातील मोटरी चालू करून पाईने आगीवर पाणी मारले. परंतू वारा प्रचंड वेगाने असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीमुळे शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कराड तालुक्यात गेल्या आठ दिवसात 50 एकरातील ऊस जळाला आहे.

COMMENTS