अहमदनगर : जुन्या घरगुती वादाच्या कारणावरून 26 वर्षीय विवाहित महिलेस पती सासू नणंद व भाया यांनी शिवीगाळ दंडाची करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ल
अहमदनगर : जुन्या घरगुती वादाच्या कारणावरून 26 वर्षीय विवाहित महिलेस पती सासू नणंद व भाया यांनी शिवीगाळ दंडाची करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील जाड काच मारून दुखापत करुन घराबाहेर हाकलून दिले.ही घटना नगर पुणे रोडवरील केडगाव येथील मोहिनी नगर येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की नेहा रियाज शेख (वय 26 राहणार आशा किराणा स्टोअर्स जवळ महिने नगर केडगाव ) हिचे तिची नणंद अफसाना अमीर शेख हिच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाले होते त्या वादातून नेहा हिस सासु रुकसाना शेख हिने शिविगाळ केली. यावरून नेहाचा पती रियाज याने तीला शिविगाळ करून घरातून हाकलुन दिले. त्यानंतर तिच्या पाठीमागून तिचा पती व भाया रियाज यांनी जाऊन तिला घरी परत बोलावले तिने घरी येण्यास नकार दिल्याने पतीने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व भाया याने शिवीगाळ केली. या मारहाणीत ती जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तिला माहेरी पाठवले. परंतु लहान मुली करिता नेहा पुन्हा सासरी आली असता तिच्या सासूने तिच्याशी वाद घालून तिच्या पतीला सांगून तिला घराबाहेर काढून दिले. त्यावेळेस नेहा हीने मी व्यवस्थित वागेल असे म्हणाली तरी तिला घरात न घेता बेदम मारहाण केली व घरातील जाड काच तिच्या हातावर मारून तिला जखमी केले.
या प्रकरणी नेहा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी पतीसह चौघाविरुद्ध गुन्ह्याची केली.
COMMENTS