Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांना मारहाण व गोंधळ घातल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा

मुंबई/प्रतिनिधी ः माटुंगा आईस्क्रीम पार्लरमध्ये गोंधळ घालणार्‍या आरोपींना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तृतीयतंथींसह सहा ज

खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा
पत्नीचा गळा आवळून गुजरातला पळाला
दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः माटुंगा आईस्क्रीम पार्लरमध्ये गोंधळ घालणार्‍या आरोपींना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तृतीयतंथींसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एका आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेश केला आणि दुकानमालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. काही आरोपींनी मालकांसमोरच अंगावरचे कपडे काढले आणि त्यांना मारहाणही केली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. रविवारी घडलेल्या याप्रकारानंतर माटुंगा सर्कल परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
माटुंगा (पू.) परिसरातील महेश्‍वरी उद्यान येथील ‘जस्ट इन सेव्हन’ आईस्क्रीम पार्लरमध्ये रविवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी ‘जस्ट इन सेव्हन’ या दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानाचे मालक जमशेद शापूर इराणी (56 ) यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या बाहेरील मातीच्या कुंड्या व दुकानाच्या जाहिरात फलकाची तोडफोड केली.
यावेळी आरोपींमधील दोन तृतीयपंथींनी अंगावरचे कपडे काढून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना पांगविण्याचा प्रयत्न केला.
मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते कुंड्यांची तोडफोड करीत होते. अखेर पोलिसांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने पोलीस विजय वाडीले यांच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हातातील दोन बोटांना दुखापत झाली. तसेच वाडिले यांचे सहकारी पोलीस हवालदार साळुंखे यांच्या हातालाही दुखापत झाली.
याप्रकरणी अमन मिश्रा, मलिका खान, नूर पाटील, सूरज साखरे, प्रिया शेख, दुर्गा राठोड यांच्याविरोधात दंगल, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकावर हल्ला करणे आदी विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना सीआरपीसीअंतर्गत नोटीस देण्यात आली होती आणि भविष्यात तपासासाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

COMMENTS