Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका वर्षात नोकरी देणारा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम ः परशराम साबळे

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था मुंबई मान्यताप्राप्त बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव मध्ये 100 टक्के देश विदेशात

कोपरगावमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर उत्साहात
महसूल विभागाच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार (Video)
हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावा

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था मुंबई मान्यताप्राप्त बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव मध्ये 100 टक्के देश विदेशात नोकरीची हमी देणार्‍या हॉटेल क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू असून तरी गरजूनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी केले आहे.
यावर साबळे यांनी माहिती देतांना सांगितले की, जगभरात हॉटेल व्यवसायाचे जाळे फार मोठे असून अनेक प्रकारचे आलीशान हॉटेल जगभरात असून भारता सोबत लंडन, सिंगापूर, मलेशिया, दुबई आदी देशात उच्च पदावर व भरमसाठ पगारावर नोकरी मिळू शकते त्यासोबतच क्रूझ लाईन, विमानतळ, मोठमोठ्या कंपन्या, मिलिटरी, रेल्वे आदी ठिकाणी देखील नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेतच त्या सोबतच स्वतःचा हॉटेल व्यवसाय देखील सुरू करता येतो.तसेच समाजातील गोर गरीब कुटुंबातील मुला मुलींना अल्पावधीतच हा कोर्से पूर्ण करताच नोकरी मिळविण्यासाठी या कोर्से चे अत्यंत उपयोग होतो. आजपर्यंत आमच्या संस्थेतील विद्यार्थी सिंगापूर, मलेशिया, दुबई लंडन,जपान या देशात नोकरी करून आले आहे तर भारतातील सर्वच मोठं-मोठ्या शहरात नोकरीला आहे तरी गरजुनी एका वर्षात 100% नोकरीची हमी देणार्‍या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था, महात्मा गांधी प्रदर्शन कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन साबळे यांनी केले आहे

COMMENTS