Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमान जयंतीनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन

संगमनेर ः शहरातील चौहानपुरा येथे हनुमान जयंती निमित्त मोरया युवक मित्र मंडळ प्रणित हनुमान जयंती उत्सव समिती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्

इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला चालविण्याचा आदेश रद्द
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार
कर्जत तालुक्यातील शिंदे गावात मारहाणीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, एक ताब्यात

संगमनेर ः शहरातील चौहानपुरा येथे हनुमान जयंती निमित्त मोरया युवक मित्र मंडळ प्रणित हनुमान जयंती उत्सव समिती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी बुधवार  दि. 24 रोजी सायंकाळी 7.00 वा. महाआरती आणि महाप्रसाद (भंडारा) चे आयोजन करण्यात आले असून यावेळी परिसरात भक्तिमय कार्यक्रमाचे देखील समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. 23  एप्रिल रोजी जन्मोत्सवनिमित्त मंदिरात पहाटे पासून धार्मिक विधी, श्रींचा अभिषेक, हनुमान चालीसा पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक आणि भाविक भक्तांच्या मदतीने जय श्रीराम, जय हनुमान..! जयघोषाने परिसर राममय झाला होता.  बुधवार  दि. 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7.00 वा. होणार्‍या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाप्रसाद (भंडारा) समिती -2024 चे अध्यक्ष राहुल मुटके यांच्यासह मोरया युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर भोईर यांनी यावेळी केले.

COMMENTS