Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्

कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू
वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट
काॅर्पोरेट क्षेत्र आणि पवार-बॅनर्जी भेटीचा अन्वयार्थ!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीविषयक उपक्रम राबवित आहेत. नवमतदारांची संख्या वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आजही जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘पथनाट्य’ आणि ‘निवडणुकीची प्रतिज्ञा’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  मतदानासंदर्भात येणार्‍या समस्या सोडविण्यासाठीही अभियानातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियान (स्वीप) अंतर्गत 177 वांद्रे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील ’एच पश्‍चिम’ विभागातील बचत गटांनी रेल्वे कर्मचारी वसाहत वांद्रे (पश्‍चिम), एफ उत्तर विभागात सायन सर्कल (सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ) तसेच 176- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील एच/पूर्व विभागातील बचत गटांनी एच/पूर्व विभाग कार्यालय प्रभात कॉलनी, सांताक्रुझ (पूर्व) याठिकाणी ’निवडणूक प्रतिज्ञा’ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील नवमतदारांना मतदानाचे महत्व समजावे आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी ’मतदान अमूल्य दान’ या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. 163-गोरेगाव विधानसभा मतदार संघ येथे महानगरपालिका पी- दक्षिण विभागातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी  मतदान जागृतीकरण अभियान अंतर्गत वनराई पोलीस स्टेशन पासून ते वनराई कॉलनी येथे मतदान जागृती अभियान फेरी काढण्यात आली. 177 वांद्रे (प.) सखी सहेली मेळावा, अंगणवाडी सेविका तसेच बचत गट यांच्यासमवेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. 27- मुंबई उत्तर – पश्‍चिम लोकसभा मतदार संघात 159- दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड  पूर्व येथे भरारी पथकाने स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘.मी मतदान करणार’ अशी शपथ घेतली. पश्‍चिम लोकसभा मतदार संघात 159 दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड  पूर्व येथे भरारी पथकाच्या स्वाक्षरी अभियानांतर्गत नव दाम्पत्यानी स्वाक्षरी करून ‘आम्ही जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणार’ अशी शपथ घेतली. तसेच 176- वांद्रे पूर्व येथील अनुयोग विद्यालय ते खार स्टेशन परिसरात अनुयोग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग,  विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, बीएलओ, पोलीस अधिकारी-पोलीस कर्मचारी, आरोग्य  सेविका, अंगणवाडी सेविका, नागरिक, यांच्या मदतीने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

COMMENTS