Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाला आण्णाभाऊ साठेंचे नाव द्या

बीड - संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला आहे. स

भाजपमध्ये मला संपवण्याचा प्रयत्न : पंकजा मुंडे
मालकाचा विश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक | LOKNews24
भूमी अभिलेख नोंदी, आधार जोडणीसाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

बीड – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला द्यावे, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला आहे. सदरील ठराव माजलगाव तालुक्यात येत असलेल्या छोटेवाडी येथील महापुरुष युवामंचने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवात घेतला आहे. त्यासाठी रास्तारोको आंदोलन करुन राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात महापुरुष युवामंचकडून देण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन हे मुंबईत गेले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आण्णाभाऊ बुलंद आवाज होते. अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकून स्वतःच्या अलौकीक साहित्य तत्वज्ञानाचे विद्यापीठ अण्णाभाऊ होते. अण्णाभाऊंनी आयुष्यभर कामगार, कष्टकरी, मानवतावादी विचारांचा झंझावत ठेवत साहित्य निर्मिती केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यापीठ’ असे नामकरण करावे, अशी मागणी महापुरुष युवामंचकडून करण्यात आली आहे. त्यासाठी संविधानिक मार्गाने रास्तारोको आंदोलन करुन मुख्यमंत्री यांना माजलगाव एसडीएम कार्यालय यांच्या मार्फत निवेदन दिले जाणार आहे.

COMMENTS