Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छेडछाडीमुळे महाविद्यालयीन तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : छेडछाडीमुळे एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात घडली. युवत

पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
नगरसेवकाची धमकी , ”तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुकडे करिन… | LOK News 24
राज्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे : छेडछाडीमुळे एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात घडली. युवतीची छेड काढणार्‍या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजिंक्य आवटे (रा. भोसरी), सुजल खुणे (रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत युवतीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती महाविद्यालय, शिकवणीला जात असताना आरोपी अजिंक्य आणि सुजल यांनी तिचा पाठलाग करुन छेडछाड केली. दोघांनी तिची छायाचित्रे काढली. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. गेले दोन महिने आरोपी तिला त्रास देत होते. त्यांच्या छेडछाडीमुळे युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.

COMMENTS