Homeताज्या बातम्याक्रीडा

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली प्रतिनिधी - क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस

आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका
विश्व विजयापासून भारत दोन पावले दूर
‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24

नवी दिल्ली प्रतिनिधी – क्रीडा पुरस्कारांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील दोन युवा बॅडमिंटन स्टार्सची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात येणार आहे. या दोघांनी जगभरात बॅडमिंटन दुहेरीत भारताचे नाव लौकिक मिळवले आहे. क्रीडा मंत्रालयाने या सर्व नावांना दुजोरा दिला आहे.

जानेवारीमध्ये सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान हे क्रीडा पुरस्कार दिले जातील. खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत लांब उडीपटू श्रीशंकर, स्टार पॅरा अॅथलीट शीतल देवी, स्टार महिला हॉकीपटू सुशीला चानू यांच्यासह 26 खेळाडूंचा समावेश आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विविध समित्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि सखोल तपासणीनंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. मंत्रालयाने सन्मानित करण्यात येणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादीही प्रसिद्ध केली आहे. हे सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात प्रदान केले जातील हे विशेष. हे सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत एकूण 29 खेळाडू आणि एथलीटांचा समावेश करण्यात आला आहे

COMMENTS