Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात पत्नीने नवर्‍याला जाळले जिवंत

लखनौ ः उत्तर प्रदेशातील एका 26 वर्षीय महिलेने आपला नवरा ‘कुरूप’ असल्याच्या विचारातून त्याला जिवंत जाळून संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा च

कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष
महायुतीचा विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला; ११-४-२ चा फॉर्म्युला ठरला, तिन्ही पक्षांमध्ये एकमत
लोकराज्य विद्या फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त स्मशानभूमीत पुरस्कार वितरण

लखनौ ः उत्तर प्रदेशातील एका 26 वर्षीय महिलेने आपला नवरा ‘कुरूप’ असल्याच्या विचारातून त्याला जिवंत जाळून संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात आता तब्बल चार वर्षांनी या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रेमश्री या महिलेने 2017 मध्ये कुर्ह फतेहगढमधील बिचेटा येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय सत्यवीर सिंगशी लग्न केले होते. पतीचा वर्ण काळा असल्याचे म्हणत प्रेमश्रीने वारंवार घटस्फोटाची मागणी केली होती. त्यांच्यात सतत वाद होत असूनही सत्यवीर नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, 2018 मध्ये या जोडप्याला एक मुलगी झाली होती.

COMMENTS