Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रसाद शुगरची पहिली उचल 2700 रुपये

अंतिम ऊस दर इतर कारखान्याच्या बरोबरीने

राहुरी ः प्रसाद शुगर अ‍ॅण्ड अलाईड ग्रो प्रॉडक्टस् लि. वांबोरी या कारखान्याचा सन 2023-24 चा गळीत हंगाम 03 नोव्हेंबरपासून चालु झालेला असून, या गळीत

राजगड पोलीस ठाण्यातील पोलीसाची गळफास लावून आत्महत्या l Lok News24
बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरला वाचवण्यात अपयश
डेंटल कॉलेज एनएसएस विद्यार्थ्यांचा दंडकारण्यात सक्रिय सहभाग

राहुरी ः प्रसाद शुगर अ‍ॅण्ड अलाईड ग्रो प्रॉडक्टस् लि. वांबोरी या कारखान्याचा सन 2023-24 चा गळीत हंगाम 03 नोव्हेंबरपासून चालु झालेला असून, या गळीत हंगामात गळीतास येणार्‍या ऊसास प्रथम उचल प्रती मे.टन 2700/- प्रमाणे व अंतीम ऊस दर इतर कारखान्यांचे बरोबरीने देण्याचे जाहिर केले असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार प्रसादराव तनपुरे, अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे व कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी दिली आहे.
या हंगामात गळीतास ऊस पुरविणार्‍या ऊस उत्पादकांना पहिली उचल रककम रु.2700/- प्रती मे.टन व इतर कारखाने जो अंतिम ऊस दर देतील त्याप्रमाणे प्रसाद शुगर ऊस दर देण्याची कारखाना व्यवस्थापन हमी देत असुन प्रसाद शुगरने आतापर्यंत ऊसाचे वजना बाबद पारदर्शीपणा ठेवलेला आहे. यापुढेही प्रसाद शुगर असेच वजनाबाबद पारदर्शीपणा ठेवील असे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री. सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले. तसेच प्रसाद शुगर कारखान्याने पहिली उचल रु. 2700/- व अंतीम ऊस दर इतर कारखान्यांचे बरोबरीने देणार असल्याचे जाहिर केल्यामुळे ऊस उत्पादकांची दिपावली गोड केली आहे . तसेच दरवर्षी प्रमाणे ऊस उत्पादकांनी ऊस गळीतास दिल्यापासुन चौदा दिवसांच्या आत पेमेंट उत्पादकांच्या खात्यांवर वर्ग करण्याचे नियमीत नियोजनामुळे ऊस उत्पादक शेतर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने 5.50 लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट निश्‍चित केलेले आहे. ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत तोडण्यासाठी सक्षम ऊस तोडणी व वाहतुक यंत्रण भरती केली असुन कारखान्याने कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्रा बाहेर स्वतंत्र ऊस तोडणी यंत्रणा कार्यन्वीत केलेली आहे. या गळीत हंगामात गळीतास उभा असलेला संपूर्ण ऊस गाळपासाठी प्रसाद शुगरला देवुन सहकार्य करावे. असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे..

COMMENTS