Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोपेतच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवलं

नाशिक प्रतिनिधी - नाशिकमध्ये झोपेतच पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीन स्वतःलाही संपवलं आहे. य

मुंबईत 25 वर्षीय एअर होस्टेसची निर्घृण हत्या
चाकूने वार करून तरुणाचा केला खून
दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.

नाशिक प्रतिनिधी – नाशिकमध्ये झोपेतच पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीन स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या आडगावमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. झोपेत असतानाच पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छामनी नगर परिसरात ही हादरवणारी घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रिती विशाल घोरपडे असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नी झोपेत असताना विशाल निवृत्ती घोरपडे याने मुसळी डोक्यात टाकत तिची हत्या केली आहे. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र  पत्नीच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS