Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळपेवाडीत कालिकामाता मंदिराचा दरवाजा तोडून चोरी

गाभार्‍यातील देवींच्या गळ्यातील मंगळसुत्र चांदीचा टोप घेऊन चोरटे पोबारा

कोपरगाव - कोळपेवाडी-मढी शिव रस्त्यावरील लक्ष्मण जेऊ घाले यांच्या वस्तीवर असलेल्या कालीकामाता मंदिराचा कोयंडा तोडून चोरांनी मंदिराच्या गाभार्‍याती

कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा
बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक झाला अ‍ॅक्टीव्ह? ; अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट, पोलिसांनी सुरू केली चौकशी
शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला

कोपरगाव – कोळपेवाडी-मढी शिव रस्त्यावरील लक्ष्मण जेऊ घाले यांच्या वस्तीवर असलेल्या कालीकामाता मंदिराचा कोयंडा तोडून चोरांनी मंदिराच्या गाभार्‍यातील देविंच्या गळ्यातील मंगळसुत्र चांदीचा टोप दानपेटी चोरून नेल्याने कोळपेवाडी परिसर चोरट्यांच्या उपद्रवाने पुरता हैराण झाला आहे.
   कोळपेवाडी-मढी शिव रस्त्यावर लक्ष्मण जेऊघाले यांनी त्याच्या वस्तीवर नऊ वर्षांपूर्वी कालीकामाता मंदीराची उभारणी करुन गाभार्‍यात कालिकामाता तुळजाभवानी व लासुरची देवी प्रतिष्ठापना केलेली असल्याने भाविक भक्तांची मंदिरात नेहमीच वर्दळ असते बुधवारी सकाळी जेऊघाले देविची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असतांना त्यांना मंदिराचा दरवाजा कोंडा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. परिसरात चोरींची घटना समजताच भावकांनि मंदिर परिसरात मोठी गर्दी केली देवतांच्या सेवेकरी यांनी सांगितले कि, भाविकांनी दिलेल्या दानातुन तिनही मातेच्या गळ्यात असणारे सोन्याचे मंगल सुत्र एकवीस भार चांदीचा टोप पाळणे व एक वर्षांपासून न उघडलेली दान पेटी वर चोरट्यांनी जवळपास लाखोंचा ऐवज चोरुन नेल्याने भाविकामध्ये पोलीस प्रशासना बद्दल कमालीचा अंसोतोष पसरला आहे. या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेगाव शिवारातील सहाचारी ला खेटून असलेल्या दिपक वंझे यांच्या वस्तीवरील महालक्ष्मी मंदिराला चोरट्यांनी लक्ष करत देविच्या गळ्यातील एक तोळ्याची पोत नऊभार चांदीचा टोप कानातील झुबे चांदिचे पाळणे दान पेटी घेवुन पोबारा केला. मागील वर्षी कोळपेवाडी पंचक्रोशीचे आराध्यदैवत महेश्‍वर मंदिरातील दान पेटी फोडून त्यामधील रक्कम चोरट्यांनी लंपास केलेल्या घटनेला एक वर्षे न उलटताच परिसरातील दोन मंदिराना चोरट्यांनी आपले सावज बनवत लाखोंच्या पुढे मुद्दे माल चोरुन नेला आहे. परिसरात घडलेल्या एकही गुन्हाचा तपास पोलीस यंत्रणेला लावण्यात आलेले अपयश हे गुन्हेगारी ला उत्तेजन देणारे ठरत आहे. कोळपेवाडी पोलिस औट पोस्ट नेहमीच बंद असल्याने परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असतात.

COMMENTS