Homeताज्या बातम्याविदेश

ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित

लंडन/वृत्तसंस्था ः ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरत असतांना, दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आ

ग्रामपंचायतींमधील 7 हजार जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक
छमछमला उस्थळ दुमाला गावातून एकमुखी विरोध !
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

लंडन/वृत्तसंस्था ः ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरत असतांना, दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले. या शहराच्या स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा राखण्यावर लक्ष केंद्रीत केले असून गरज नसलेल्या खर्चावर कात्री लावली आहे. लाखो पौंडांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तुटवडयामुळे शहर प्रशासनाने दिवाळखोरी घोषित केली. बर्मिंगहॅम नगर प्रशासनावर मजूर पक्षाची सत्ता आहे. 100 हून अधिक नगरसेवकांचा समावेश असलेली हे युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक प्राधिकरण आहे. शहरातील नागरिकांचे आर्थिक संरक्षण करणे महत्त्वाचे असून वैधानिक सेवा वगळता नवीन खर्च थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS