संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, काप
संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली. तसेच तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा सुध्दा शिल्लक राहिला नसून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन, संगमनेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी. अशा आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुका शिवसेना (ठाकरे) यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गावांना टँकर मार्फत पाणीपुरवठा चालू करण्यात यावा. नाफेडमार्फ़त सुरु असलेले कांदा खरेदी केंद्राबाबत मागणी करत नाफेडच्या जाचक अटी व शर्थी शिथिल करून नियम बदलण्यात यावेत. सर्व शेतकरी बांधवांना या दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन भरीव मदत करावी. राजकारण न करता आपण आमच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा. शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा.असे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख परवेज शेख, विभागप्रमुख विजय भागवत, शहर संघटक दीपक साळुंखे, शिवसेना तालुका सचिव संदीप राहणे, सचिव कचरू पाटील वारुंगशे, उपतालुकाप्रमुख शरद कवडे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, इम्तियाज शेख ,दीपक वन्नम ,शाखाप्रमुख प्रकाश चोथवे, रहीम बेग, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे,विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे, ब्रह्मा खिडके, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी व शिवसैनिक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
-प्रतिक्रिया ः संगमनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नाफेडच्या अटी शिथिल करा. अशी मागणी आम्ही करत असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार सर्व शिवसैनिक हे शेतकरी बांधवांच्या सोबत उभे असून प्रशासनाने न्याय देण्याची विनंती करतो.- अमर कतारी, शिवसेना शहर प्रमुख.
COMMENTS