Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबिटखिंड येथील 200 विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप

अकोले/प्रतिनिधी ः  तालुक्यातील अबिटखिंड येथील 200 विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्

पोलिसांचे संचलन देऊन गेले चर्चांना उधाण ; अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेच्यादृष्टीने पोलिसांची लेफ्ट-राईट
भगवान बाबाच्या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे राहणार उपस्थित
ढाकणे यांची गांधीगिरी करत पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

अकोले/प्रतिनिधी ः  तालुक्यातील अबिटखिंड येथील 200 विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने अबिटखिंड येथील गोरगरीब, आदिवासी,बहुजन समाजातील विद्यार्थांना वह्या, दप्तर,पेन्सिल किट,आणि शैंडल अशा वेगवेगळ्या वस्तू देऊन गरीब मुलांना मदत केली. त्यामध्ये मुंबईचे दिनेश परमार (थोर समाजसेवक),भाजनलाल रोहरा (उद्योजक मुंबई), सुरेश भाई मेहता ( अध्यक्ष,शांती फाउंडशन. मुंबई), जयश्री चौधरी (ङखउ ेष खपवळर), यांनी आदिवासी मुलांना ही मदत केली. हे सर्व साहित्य मुलांना पोहचवण्यासाठी रामनाथ भोजने (अध्यक्ष.भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई. अबिटखिंड नोकर स्टाप कमिटी)भाऊसाहेब जगधने (उपसचिव.भैरनाथ सेवा. मंडळ मुंबई.अबितखिंड नोकर स्टाप कमिटी) यांनी विशेष परिश्रम घेतले सदरील कार्यक्रमासाठी अबितखिंड गावचे सरपंच यमुना घनकुटे , उपसरपंच भारमल ,ग्रामसेवक सुकटे,भानुदास गोडे, तंटामुक्ती अध्यक्ष,मधुकर जगधने (माझी अध्यक्ष तंटामुक्ती), रामनाथ भोजने (ग्रामपंचायत सदस्य), सुधाकर गोडे(खजिनदार, भैरवनाथ सेवा मंडख, मुंबई),सीताराम राऊत, व इतर सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ व पालक विद्यार्र्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.वरील कार्यक्रमाचे नियोजन सर्वोदय विद्या मंदिर अबिटखिंडचे मुख्यध्यापक डी.डी.फापाळे व शिक्षकवृंद, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक राजेंद्र उकिर्डे, जि.प.प्राथमिक शाळा भोजनेवाडी वायल, जि.प.प्राथमिक शाळा वाजेवाडी दिघे व भागित यांनी वरील  केले.

COMMENTS