Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.क्षीरसागरांकडून विकास कामाचे उद्घाटन

सय्यद नगरमधील रस्ताकामाला सुरूवात

बीड प्रतिनिधी- आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.16) रोजी शहरात जाऊन रस्ता व नालीबांधकामाचे उद्घाटन केले. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार नवीन काम

Solapur : करमाळा ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे आंदोलन (Video)
माझा मृत्यू झाल्यानंतर मला औरंगाबादच्या भूमीत दफन करा: ओवेसी
आदिवासी समाज नेहमीच अग्रेसर – वाघेर

बीड प्रतिनिधी- आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.16) रोजी शहरात जाऊन रस्ता व नालीबांधकामाचे उद्घाटन केले. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार नवीन कामांना लवकरात लवकर सुरूवात करण्याच्या सुचना दिल्या.
शहरातील सय्यद नगर भागातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामाचे उद्घाटन आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.16) रोजी केले. हे दर्जेदार करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला निर्देश दिले. तसेच कै.शिवाजीराव धांडे नगर मधील मुख्य रस्त्याच्या बाजुला मोठा नाला आहे. पावसाळ्यात या नाल्याचे दूषित पाणी रस्त्यावर येते. याबाबत येथील नागरिकांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ.संदीप क्षीरसागर यांनी याभागात रस्ता व नाली बांधकाम करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासोबत माजी आ.सय्यद सलीम, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS