Homeताज्या बातम्यासंपादकीय

कारागृहातील प्रशासनाला हादरे

पश्‍चिम महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूरचे कळंबा व पुणे येथील येरवडा येथील कारगृहात गेल्या काही दिवसापासून कैद्यांनी चालवलेल्या कार

कामगारांनी स्वत:च्या हितासाठी निर्णय घेण्याची घडी
भाजपला बोध
भाजप सत्ता आणि वाद

पश्‍चिम महाराष्ट्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूरचे कळंबा व पुणे येथील येरवडा येथील कारगृहात गेल्या काही दिवसापासून कैद्यांनी चालवलेल्या कारनाम्यावर माध्यमांनी वारंवार प्रकाश टाकला. मात्र, ह्या कारनाम्याच्या खोलात गेल्यास राज्यातील मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे निर्माण होतात. त्यामुळे तात्काळ तपासी अधिकार्‍यास बाजूला सरकवण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही कारागृहामध्ये कच्चे कैदी व पक्के कैदी ठेवण्यात येतात. त्यांच्या जरी सामना होत नसला तरीही कारागृहातील पेड हस्तकांच्या माध्यमातून त्यांच्या भेटी घडवल्या जातात. भेटीदरम्यान, कारागृहातून बाहेर पडण्यासाठी दोन गटात मारामार्‍या होत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. मात्र, यासाठी गंभीर दुखापत झाली तरच उपचाराच्या निमित्ताने कारागृहाबाहेर नेण्यात येते. मात्र, कळंबा व येरावडा या कारागृहात ही सुविधा आतच असल्याने कैद्यांच्या या शक्कलीचा काहीही उपयोग होत नाही. मग कारागृहात पेड हस्तकाच्या माध्यमातून आरोपीस मोबाईल दिला जातो. तसेच कारागृहातील कैद्यांचा बाहेरच्या जगाचा संपर्क तोडण्याच्या हेतूने कारागृहात नेटवर्क जाम करणारे जामर बसविण्यात आले आहेत. मात्र, या जामरमुळे कारागृहातील नेटवर्क जाम होण्यापेक्षा परिसरातील नेटवर्क जाम होते. मात्र, कारागृहातील नेटवर्क चांगल्या पध्दतीने सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षात कित्त्येकदा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींकडे मोबाईल सापडले. तसेच कारागृहातील आरोपीच्या मागणीनुसार गांजा सारखा अंमली पदार्थ पेड हस्तकांच्या माध्यमातून पोहचविला जात होता. या घटनेमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील कारागृहांच्या परिसरातील रिकाम्या जागांच्या हद्दी निश्‍चित करून कंपाऊंड घालण्यात आली आहेत. तसेच सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम करण्यात आले आहे. तरीही कारागृहात मोबाईल व अंमली पदार्थ पोहचवण्यासाठी चेंडूचा वापर केला जात असल्याचे कोल्हापूरमध्ये निदर्शनास आले होते. चेंडू हलका असल्याने सहज रित्या तगडा व्यक्ती किमान 100 फुट उंच फेकू शकतो. त्यामुळे चेंडूमध्ये असे अंमली पदार्थ भरून कारागृहाच्या विशिष्ट परिसरात फेकण्याचा प्रकार गेल्या वर्षी निदर्शनास आला होता. या प्रकाराने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळ विनाकारण कारागृहात अडकलेल्या नागरिकांना याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. विनाकारण कोणीही व्यक्ती कारागृहात येत नाही. मात्र, चूकून आला तर तो आरोपी असेलच असे नाही. कारण काही ठिकाणी विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे पोलीस यंत्रणा त्यांच्या पध्दतीने कारवाई करून कच्चे कैदी कारागृहात पाठवते. त्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत अतिसंवेदनशिल प्रकरणामधील संशयितांना कारागृहात ठेवावे लागते. निकाल काय लागेल, याचा काहीही अंदाज नसल्याने कारागृह प्रशासन न्यायालयीन कामकाज वगळता कोणत्याही कामासाठी संशयितांचा ताबा पोलिसांकडे देत नाही. त्यामुळे कारागृहात खितपत पडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोणत्याही व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला की, त्याला अटक करून डांबून ठेवायचे नाही अशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आली आहे. मात्र, अल्पशिक्षित पोलीस यंत्रणा आपला दरारा दाखविण्याच्या नादात र्निदोष व्यक्तीविरोधात अटकेची कारवाई करतात. संबंधितास चांगला वकील न मिळाल्यास त्याचे आयुष्य अंधकारमय होत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी केलेल्या चूकांची शिक्षा र्निदोष व्यक्तीला भोगावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे कच्चे कैदी हतबल होवून मानसिक संतुलन बिघडल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व घटनांचा परिपाक म्हणून अधिकार्‍यांना आरोपींच्या मनासिकतेच्या अभ्यासासाठी वारंवार मानसोपचार तज्ज्ञांना पाचारण करावे लागत आहे.

COMMENTS