Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहावर्षीय मुलीचा बारावर्षीय मुलाकडून विनयभंग

पुणे ः पुण्यातील उरळीकांचन परिसरामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा 12 वर्षीय मुलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर

जुनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन : डॉ. भारत पाटणकर
श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या
Pune : पुण्यात गांजाची शेती करणाऱ्यांना अटक (Video)

पुणे ः पुण्यातील उरळीकांचन परिसरामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा 12 वर्षीय मुलाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात 12 वर्षीय मुलावर विनयभंगसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या 25 वर्षीय आईने या प्रकरणी आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी अल्पवयीन मुलगा पीडित मुलीच्या शेजारी राहतो. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपीने मुलगी घरात असताना तिचे तोंड दाबून तिला मारहाण केले. तसेच तिचे कपडे काढून तिच्या गुप्तांगला स्पर्श करत लज्जा उत्पन्न केली. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस घोडके पुढील तपास करत आहेत.

COMMENTS