Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्युटी संपली अन् ड्रायव्हर गेला रेल्वे फलाटावार सोडून  

यवत रेल्वे स्थानकावरील प्रकार; प्रवाशांसह खासदाराचा संताप

पुणे : ड्युटी संपल्यामुळे रेल्वे फलाटावर सोडून ड्रायव्हर घरी गेल्याची अजब घटना पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावर घडली आहे. खासदार सुप्रिया सुळे यां

आरक्षणासाठी अहिल्यादेवींच्या चरणी प्राणाहुती देण्यास तयार
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात
स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

पुणे : ड्युटी संपल्यामुळे रेल्वे फलाटावर सोडून ड्रायव्हर घरी गेल्याची अजब घटना पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावर घडली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर करत प्रवाशांना झालेल्या नाहक त्रासाची कैफियत मांडली आहे. पुण्याच्या यवत रेल्वे स्थानकावर 2 फलाट आहेत. या दोन्ही फलाटावर सोमवारी रात्री 2 मालगाड्या उभ्या होत्या. यामुळे डेमू रेल्वेने येणार्‍या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या दोन्ही रेल्वेगाड्या ओलांडून फलाटावर जावे लागले. यामुळे महिला, मुले व वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही मालगाडी चालू न झाल्यामुळे एखादी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रवाशांनी या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
’पुणे – बारामती डेमू रेल्वेने आम्ही अनेकजण यवत-पुणे रोज प्रवास करतो. पुण्याहून यवत येथे आलेली आमची गाडी फलाटावर न थांबवता मुख्य मार्गिकेवरच थांबवली. त्यामुळे पायर्‍या नसलेल्या डेमूच्या बोगीतून उतरणे व दोन्ही बाजूंच्या फलाटालगत असलेल्य मालगाड्या ओलांडून फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना खुपच कसरत करावी लागली. आम्ही 20-25 पासधारकांनी यवतच्या स्टेशन मास्तरांकडे लेखी तक्रार केली. तेव्हा मालगाडीचा चालक ड्युटी टाइम संपला असे म्हणून गाडी सोडून गेला’, असे एका प्रवाशाने याविषयी सांगितले. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत थेट रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रुळ ओलांडून फलाटावर यावे लागले. हा प्रसंग रात्री घडला, त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. रेल्वे ड्राईव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असे बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आले.  

COMMENTS