Homeताज्या बातम्याक्रीडा

क्रिकेटर प्रवीण कुमारच्या कारचा भीषण अपघात

नवी दिल्ली: भारताचा धाकड यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा या वर्षाच्या सुरुवातीलाच एक भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत जबर जखमी झाला होता. त्यामुळे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या विराज पिसाळ ने पटकाविले सुवर्णपदक
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे

नवी दिल्ली: भारताचा धाकड यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा या वर्षाच्या सुरुवातीलाच एक भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत जबर जखमी झाला होता. त्यामुळे तो बराच काळ भारतीय संघापासून लांब आहे. आता अशाच अजून एक क्रिकेटपटूच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात क्रिकेटपटूच्या कारला समोर कंटेनरने जोरात धडक दिली आहे. यावेळेस क्रिकेटपटूंचा मुलगाही त्याच्यासोबत होता.

रताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कॅंटरने धडक दिली यावेळी क्रिकेटर आणि त्याचा मुलगा कारमध्ये होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लोकांनी कंटर चालकाला पकडले होते. नंतर पोलिसांनी येऊन त्याला ताब्यात घेतले. ३६ वर्षीय प्रवीण कुमारने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. प्रवीण कुमार हे बागपत रोडवरील मुलतान नगरमध्ये राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, कुमार रात्री १०.३० वाजता डिफेंडरच्या कारमधून जात होते, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही गाडीत होता. पांडवनगरकडे निघालेले प्रवीण कुमार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या कंटरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये क्रिकेटपटूच्या गाडीचे नुकसान झाले. प्रवीण कुमार यांच्या कारला कंटरने धडक दिली. अपघातानंतर तेथे अनेकांची गर्दी झाली होती. लोकांनी कॅंटर चालकाला मोठ्या हुशारीने पकडले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच कॅंटर चालकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुदैवाने, क्रिकेटर आणि त्याच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार आणि त्यांचा मुलगा सुखरूप आहेत.

COMMENTS