Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे

कुडाळ / वार्ताहर : प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम केला जातो. याकरीता दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी येथील जिल्हा परिषदेची श

जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप
सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले
तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी

कुडाळ / वार्ताहर : प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम केला जातो. याकरीता दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी येथील जिल्हा परिषदेची शाळाच महत्वाची ठरते. आज जिल्हा परिषदेच्या पेट्री बंगला शाळेतील मुख्याध्यापक लक्ष्मण गोरे प्रामाणिकपणे भूमिका बजावत आहेत. गेली सात वर्षांपासून दररोज सकाळी नऊ वाजता ही शाळा भरते. येथील विद्यार्थ्यांना दीड तास इंग्रजी व्याकरणाचे धडे दिले जातात. या अभिनव उपक्रमाने इंग्रजीसारखा विषय सर्वांच्या आवडीचा झाला आहे.
मागील सात वर्षापासून ही शाळा सकाळी नऊ वाजताच उघडते. या शाळेतील मुख्याध्यापक लक्ष्मण गोरे हे मागील सात वर्षापासून स्वतः 9 वाजताच शाळेत उपस्थित राहतात. सर्व विद्यार्थी 9 वाजता उपस्थित राहून 15 मिनिटात वर्ग व शालेय परिसर स्वच्छता करतात. त्यानंतर सव्वानऊ ते पाऊणेअकरापर्यंत इंग्रजी व्याकरणाचा जादा तास होतो. असा दिनक्रम मागील सात वर्षापासून अखंडपणे याठिकाणी सुरू आहे. सध्या या शाळेत 4 थी ते 7 वी पर्यंतचे 26 विद्यार्थी शिकत आहे. घाटाईपासून जांभळमुरे अशा 9 गावातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे इंग्रजी विषयाचे व्याकरण शिकविले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना इंगजीविषयाची वाटणारी अनाठायी भिती दूर झाली आहे. इंग्रजी हा त्यांच्या आवडीचा विषय झाला आहे.
इंग्रजी विषयाविषयी आवड निर्माण झाल्याने पुढे या शाळेचे विद्यार्थी निर्भीडपणे विज्ञान शाखेकडे प्रवेश घेत आहेत. कोरोना काळात मागील दोन वर्षांत या शाळेत मुंबई पुणे येथून इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला आहे. या शाळेत इंग्रजी सुधार उपक्रमाबरोबर वैभव चिखले या शिक्षकांनी गणित व क्रीडा विभागात सुध्दा विद्यार्थ्याची चांगल्या पध्दतीने गुणवत्ता वाढविली आहे. या शाळेचे विद्यार्थी लगोरी तसेच कब्बड्डी या खेळातही निपूण आहेत. पेट्री बंगला शाळेने आपली गुणवत्ता सिध्द करून दाखविली आहे. विद्यार्थ्यांना कोरोना काळापासून आजपर्यंत मोबाईचा वापर करू दिला नाही.

COMMENTS