Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घनकचरा व्यवस्थापनासाठी 2 टिप्परची खरेदी

लातूर प्रतिनिधी - स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून 2 गार्बेज टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. मनपा आय

उद्या भविष्यात अहिल्यानगरच्या जनतेच्या जीवाला धोका पोहोचल्यास याला जबाबदार कोण ?
नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता
‘बार्टी’तर्फे एमपीएससी अभियांत्रिकी मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य

लातूर प्रतिनिधी – स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी लातूर शहर महानगरपालिकेकडून 2 गार्बेज टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या उपस्थितीत महिला अधिका-यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. लातूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत.त्या अंतर्गत मनपाकडून सादर करण्यात आलेल्या 32.62 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पा अंतर्गत महानगरपालिकेकडून या 2 गार्बेज टिप्परची खरेदी करण्यात आली आहे. शासनाकडून त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. प्रत्येकी तीन टन कचरा वाहतूक करण्याची या टिप्परची क्षमता आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी व शहर स्वच्छतेसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी महानगरपालिकेतील महिला अधिका-यांना टिप्परचे लोकार्पण करण्याचा मान दिला. उपायक्त मयुरा शिंदेकर व सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे यांनी श्रीफळ फोडून या टिप्परचे लोकार्पण केले. मनपा आयुक्तांसह अधिकारी व कर्मचा-यांची यावेळी उपस्थिती होती.

COMMENTS