Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय कौतुकास्पद

कोळपे यांनी मानले राज्य सरकार व आमदार काळेंचे आभार

कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या दहा महिन्यापूर्वी सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यातील जनतेसाठी

अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्ता करावा
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट
एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या दहा महिन्यापूर्वी सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यातील जनतेसाठी वेगवेगळे अनोखे निर्णय घेताना दिसून येत असून नुकताच राज्य शासनाने परिपत्रक काढत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच येत्या 31 मे रोजी राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येकी दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील माजी सरपंच तथा पत्रकार सचिन नामदेव कोळपे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंगळवारी 9 मे रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार महिला आणि बालविकास क्षेत्रात किमान तीन वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या प्रत्येकी दोन महिलांना ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ तसेच रोख 500 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामपंचायत सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समिती गावातील दोन कर्तबगार महिलांची पुरस्कारासाठी निवड करील. या समितीत ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश असेल. पुरस्कार कार्यक्रमासाठी अंदाजे दोन हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण समितीने राबवयाच्या योजनांमधून करण्यात येणार असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत धनगर बहुल भागांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीस समाधानकारक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  सुरेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार  सचिन नामदेव कोळपे यांनी आमदार काळे यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे असून गेल्या अनेक वर्षानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक समाजातील घटकांसाठी झटणारा सर्व समावेशक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार काळे लाभले असल्याचे मत कोळपे यांनी व्यक्त करत कोपरगाव तालुक्यातील विविध भागात आमदार काळे यांच्या संकल्पनेतून जो विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून येणार्‍या काळात यामुळे नक्कीच तालुक्याचा कायापालट होणार असल्याचे विश्‍वास कोळपे यांनी व्यक्त केला.

COMMENTS