Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई येथील सराफ व्यापारी पाथर्डीतून बेपत्ता

दीड दिवस उलटूनही ठाव ठिकाणा लागेना..

पाथर्डी प्रतिनिधी - ५ फेब्रुवारी रोजी मुंबईवरून निघून मंगळवारी पाथर्डी येथे सोन्याच्या व्यापाराच्या कामानिमित्त आलेल्या व्यापारी दिपेशकुमार अश

BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24
मशीराने धरला रमजानचा उपवास
प्रत्येकाची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमाची गरज – भूपेंद्र रासणे

पाथर्डी प्रतिनिधी – ५ फेब्रुवारी रोजी मुंबईवरून निघून मंगळवारी पाथर्डी येथे सोन्याच्या व्यापाराच्या कामानिमित्त आलेल्या व्यापारी दिपेशकुमार अशोक जैन (रा.कुर्ला पश्चिम मुंबई) हे बुधवारी (७ फेब्रुवारी) बेपत्ता झाले असून याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दिपेशकुमार यांचे चुलत भाऊ तनसुख केवलचंद जैन यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली आहे.दरम्यान या घटनेला दीड दिवस उलटला असून अजूनही बेपत्ता व्यापाराचा ठाव ठिकाणा लागला नसून या घटनेने सराफ व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

         याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,तनसुख जैन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,गेल्या वीस वर्षांपासून दिपेशकुमार जैन हे पाथर्डी येथे येवुन सोन्याचा व्यापार करत आहेत.५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोन्याच्या व्यापारानिमित्त पाथर्डीला जात असल्याचे ते कुटुंबाला सांगून आले होते.त्यानंतर पाथर्डीतील एका खाजगी लॉजमध्ये ते नेहमीप्रमाणे मुक्कामासाठी थांबले.बुधवारी (ता.७ फेब्रुवारी) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे आणि त्याच्या पत्नीचे फोनवर संभाषण झाले.त्याच रात्री पुन्हा फोन केला त्यावेळी दिपेशकुमार यांचा फोन लागत होता पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी

पाथर्डीत त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांना संपर्क साधला मात्र त्यांचा कोणताच ठाव ठिकाणा लागत नसल्याने पाथर्डी येथे येत ते ज्या लॉजिंग वर थांबले होते तिथे जावून दुस-या चावीने त्यांची खोली उघडुन पाहिले असता दिपेश कुमार याची बॅग व मोबाईल मिळुन आला.पुन्हा त्यांच्याशी संबंधित लोकांकडे त्यांची चौकशी करत पाथर्डी शहरात त्याचा शोध घेतला परंतू दिपेश कुमार मिळुन आला नाही असे तक्रारीचा शेवटी म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल आव्हाड करत असून बेपत्ता सराफ व्यापाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून शुक्रवारी दुपारपर्यत बेपत्ता सराफ व्यापारी मिळून आला नसल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

शहरातून सराफ व्यापारी बेपत्ता झाल्याने पाथर्डी पोलिसांसमोर त्याला शोधण्याचे मोठे आवाहन उभे राहिले.या घटनेनंतर अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असून बेपत्ता जैन सापडल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे..

COMMENTS