Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

बीड प्रतिनिधी - सध्या मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहे. मराठा आरक्षणची मागणी घेत आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून मुलीची केली हत्या | LokNews24
जगदगुरू बाबाजींच्या परंपरा प्रत्येकासाठी  लाभदायी  उत्तराधिकारी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे प्रतिपादन 
वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात

बीड प्रतिनिधी – सध्या मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहे. मराठा आरक्षणची मागणी घेत आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणावर चर्चा झाली. राज्य सरकारला 24 डिसेंबरचे अल्टिमेटम दिले असून उद्या त्याची मुदत संपत आहे. बीड येथे मनोज जरांगे हे मोठी सभा घेणार आहे. यासाठी तयारी सुरु आहे. त्या पूर्वी बीड मध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षणाची मागणी घेत आपले आयुष्य संपविले आहे.

बीडच्या बार्शीनाका परिसरात शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी रात्री सदर घटना घडली असून मधुकर खंडेराव शिंगण असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या इसमाने एक चिट्ठी लिहिली आहे त्यात त्याने मी मराठा आरक्षणासाठी आपले आयुष्य संपवत असल्याचे लिहून दिले आहे. त्याने लिहिले की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढत असून ते चांगले काम करत आहे. त्यांनी माझ्या मृत्यू नंतर माझ्या कुटुंबीयांची भेट द्यावी. मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

COMMENTS