कोपरगाव प्रतिनिधी ः अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पश्चिम भागातील शेतकर्यांना शासनाने जाहीर केल
कोपरगाव प्रतिनिधी ः अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पश्चिम भागातील शेतकर्यांना शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळालेली आहे; परंतु पूर्व भागातील शेतकर्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. पूर्व भागातील तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकर्यांना अतिवृष्टीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने कोपरगाव येथील तहसीलदारांकडे करण्यात आली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालयात मासिक आढावा बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, विविध गावांचे सरपंच व अन्य पदाधिकार्यांनी नायब तहसीलदार पी. डी. पवार व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना भेटून विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर पवार व सूर्यवंशी यांनी हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, विलासराव माळी, माजी संचालक मधुकर वक्ते, बाबासाहेब नेहे, निखील औताडे, किशोर शिंदे, सचिन औताडे, जालिंदर थोरात, कैलास वक्ते, संजय वक्ते, भाऊसाहेब वक्ते, नितीन पाचोरे, माहेगाव देशमुखचे माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, आपेगावचे सरपंच किसनराव गव्हाळे, खिर्डी गणेशचे सरपंच चंद्रकांत चांदर, धारणगावचे दीपक चौधरी, तिळवणीचे सरपंच पिराजी शिंदे, बहादरपूरचे कैलास रहाणे, शरद गडाख, शरद वाघ, राजेंद्र पगार, भाजप दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, विकास निकम, अशोक गवारे, प्रकाश भाकरे, जयराम वारकर, कचेश्वर आहेर, कचरू भाटे, प्रदीप चव्हाण, विजय कुर्हे, हेमंत निकम, मुरलीधर वाकचौरे, नारायण लोहकणे,पोपटराव पवार, रमेश क्षीरसागर, नंदकुमार रक्ताटे, विठ्ठल सानप, निवृत्ती सानप, निलेश सानप, रामदास शिंदे, संदीप गुरुळे, प्रकाश दवंगे, बापूसाहेब पवार, सुरेश चंदनशिव, सर्जेराव कुर्हाडे, बबनराव राजगुरू, राजेंद्र शेळके आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS