नव्या सरकारमध्ये नगरमधून कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नव्या सरकारमध्ये नगरमधून कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?

विखे-शिंदे-राजळे समर्थकांना आशा

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता नगर जिल्ह्याच्या आशा एकवटल्या आहेत. राज्यातील नव्या सरकारमध्ये

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री
“पुष्पा” अवतरला नगरमध्ये ; चंदनाची वाहतूक: दोघांच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता नगर जिल्ह्याच्या आशा एकवटल्या आहेत. राज्यातील नव्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातून कोणाला भाजपकडून मंत्री करण्यासाठी फडणवीस हिरवा कंदील दाखवतात, याची उत्सुकता आहे. दरम्यान, माजी विरोधी पक्ष नेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे, नुकतेच विधान परिषदेचे आमदार झालेले प्रा. राम शिंदे व पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या समर्थकांना आपल्या नेत्याच्या मंत्रीपदाची आशा लागली आहे. अर्थात जिल्ह्यातील भाजपचे चौथे आमदार श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते यांनाही मंत्रीपदाचा अनुभव असल्याने तेही दावेदारी करू शकतात. पण आजारपणामुळे त्यांना मर्यादा आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळातील नगर जिल्ह्याचे नवे मंत्री कोण, याची उत्सुकता वाढली आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता आता जिल्ह्यातून कोण मंत्री होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

शिंदेंना अडचण, विखे-राजळे फॉर्मात
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे कर्जत-जामखेडचे माजी आमदार व माजी पालकमंत्री आणि आता विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे हे नव्या सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. पण त्यांच्यासमोर अडचण अशी आहे की, आताच 10 दिवसांपूर्वी त्यांना विधान परिषद आमदारकीची लॉटरी लागली आहे, या आमदारकीची त्यांनी अजून शपथही घेतलेली नाही. अशा स्थितीत लगेच त्यांना दुसरी मंत्रीपदाची लॉटरी फडणवीस देतील की नाही, याबाबत खात्री नाही. मात्र, माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना असलेला मंत्रीपदाचा अनुभव पाहता त्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी नक्की मिळणार, याची खात्री त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच राज्यातील नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण होतो, यावर नव्या मंत्र्यांची नावे निश्‍चित होणार आहेत. भाजप व शिंदे गटातील जो गट मुख्यमंत्री होईल, त्या गटाला कमी मंत्रीपदे व दुसर्‍या गटाला जास्त मंत्रीपदे असे वाटप होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर भाजपला जास्त मंत्रीपदे मिळू शकतात व अशा स्थितीत नगर जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळू शकते व या पदावर पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची किमान राज्यमंत्री म्हणून वर्णी लागू शकते, असेही त्यांच्या समर्थकांद्वारे सांगितले जाते. नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागील अडीच वर्षांपासून विजनवासात पडलेल्यांचे भाग्य मात्र आता नव्या सरकारमुळे उजळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेना आता असेल की नसेल?
नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. नेवाशाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळवले होते. पण आता फुटलेल्या शिवसेनेसमवेत ते नसल्याने तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी मागील 8-10 दिवसात साथ दिली असल्याने त्यांना नव्या सरकारमधील नव्या मंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे राज्यात जरी शिवसेनेच्या एका गटाचे सरकार असले तरी त्या गटाचा कोणताही मंत्री नगर जिल्ह्यात नसेल, असेही दिसू लागले आहे.

COMMENTS