Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर

आनंदराव शामराव पाटील इस्लामपूर बाजार समिती निवडणूक : सागर मलगुंडे यांची माहितीइस्लामपूर / प्रतिनिधी : शिवसेनेचे उमेदवार धनपाल माळी यांनी दाखल के

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू
पाटण तालुक्यातील नरबळी प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन घट्ट

इस्लामपूर बाजार समिती निवडणूक : सागर मलगुंडे यांची माहिती
इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवसेनेचे उमेदवार धनपाल माळी यांनी दाखल केलेल्या हरकतीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव शामराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला.
एकूण चार उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्या होत्या. यामध्ये विश्‍वास संपतराव पाटील, माजी सभापती अल्लाउद्दीन चौगुले, निवास पाटील हे उमेदवार पात्र ठरले आहेत. तसेच उर्वरित अर्जावर हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उच्च स्तरीय स्पेशल ऑडिट करण्यात यावी, अशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहीती शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. उमेश कोळेकर यांनी काम पाहिले. उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर निळकंठ, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, अशोक माळी, शहर संघटक सतिश पाटील आदी उपस्थित होते.

COMMENTS