म्हावशी परिसरात बिबट्याचे दर्शन

Homeमहाराष्ट्रसातारा

म्हावशी परिसरात बिबट्याचे दर्शन

म्हावशी, ता. पाटण येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.

सुनील उकर्डे यांना सांदिपणी गुरुकुलचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना


पाटण /प्रतिनिधी : म्हावशी, ता. पाटण येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. मानवी वस्तीत अचानक बिबट्याने दर्शन दिल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

सद्या तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत सुरू असतानाच शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास म्हावशी गावातील हनुमान वॉर्डच्या पूर्विकडील वस्तीत बिबट्याने धडक दिली. येथील वॉर्ड शेजारी असलेल्या जनावरांच्या शेड भवती फिरत असताना मोळावडे व प्रकाश मोळावडे यांनी बिबट्याला पाहिले. सुमारे 10 फुटांवर असलेल्या बिबट्याला समोर पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा करत जवळील नागरिकांना बोलावले. क्षणार्धात अनेक नागरिक एकत्र आले. एकच गोंधळ उडाला. यावेळी अन्य काहींनाही बिबट्याचे दर्शन झाले. या जागी बिबट्याच्या पायांचे ठसे उठलेले असल्याचे आढळून आल्याने काही धाडसी युवकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, बिबट्याने डोंगराचे दिशेने धूम ठोकली. शिवाय यापूर्वीही डोंगराचे शेजारी गावकर्‍यांनी बिबट्या पाहिला आहे तर दरम्यानच्या काळात काही शेळ्याही गायब झाल्याचे प्रकार घडले आहेत. शुक्रवारी भरवस्तीत झालेल्या बिबट्याचे वावरामुळे नागरिकांमध्ये कमालीची घाबराहट निर्माण झाली आहे. त्यामुळे एखादी जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

COMMENTS