Homeताज्या बातम्यामनोरंजन

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला दुखापत

बेंगळुरू प्रतिनिधी - संजय दत्त बॉलीवूडमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत,

मुंबईत बनावट लसीकरणाचा आणखी एक प्रकार
अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं | LOKNews24
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)

बेंगळुरू प्रतिनिधी – संजय दत्त बॉलीवूडमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत, मात्र अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाला आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’ साठी बेंगळुरूच्या परिसरात शूटिंग करत आहे. हा अपघात झाला तेव्हा तो चित्रपटातील ब्लास्ट सिक्वेन्सचे शूटिंग करत होता.

रिपोर्ट्सनुसार, त्याच्या हाताला, चेहऱ्याला आणि कोपरावर जखमा झाल्या आहेत. तो फाईट मास्टर रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी फाईट सीनची तयारी करत होता. याचदरम्यान हा अपघात झाला आणि अभिनेता त्याचा बळी ठरला. संजय दत्त बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. या घटनेनंतर संजय दत्तचे चाहते खूप चिंतेत आहेत. 

COMMENTS