Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा आर्थिक फायदा व्यापार्‍यांनाच

शेतकर्‍यांच्या व्यथा आजही कायम.

किनवट प्रतिनिधी - जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याचे हाल काही संपता संपेना. ऊन,पावसात रात्रंदिवस काबाडकष्ट करून सोन पिकवतो चार महिन्याच्या नंतर प

जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
दिग्गज मल्ल घडविणार्‍या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका !
 उध्दव ठाकरेंनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे- मंत्री अब्दुल सत्तार 

किनवट प्रतिनिधी – जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याचे हाल काही संपता संपेना. ऊन,पावसात रात्रंदिवस काबाडकष्ट करून सोन पिकवतो चार महिन्याच्या नंतर पीक काढणीला येत असतानाच वादळ, वारा, तुफान, गारा,मेघगर्जनेसह पाऊस अशी अनेक संकटे येउन होत्याचं नव्हतं केलं जातंय. अक्षरशः शेतकरी शेतातील नुकसानीचे चित्र पाहून हंबरडा फोडून ओक्सा बोक्षी रडतो. पण सरकारला या रडण्याचा आवाज ऐकू येत नाही. दोन दोन महिने उलटून गेली तरी शासनाची पंचनामे होत नाही. शेतकरी राजा मुलीचे लग्न,मुलांचे शिक्षण, सावकारी कर्जाची परतफेड करता येत नसल्याने कुणी शेतात तर कोणी घरीच फासावर लटकलेला दिसतो. उरला सुरला हाती आलेला माल विक्रीसाठी बाजारात नेला तर व्यापारी किमती पाडून खरेदी करतो मात्र शासनाला शेतकर्‍यांच्या मालाची हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण निश्चित होत नसल्याने शेतकरी काबाड कष्ट करून ही उपाशी व्याकुळ असतो. ही  परिस्थिती बदलण्याची धमक केवळ काँग्रेस सरकार मध्येच आहे.असे मत किनवट तालुका किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अडकिने पाटील यांनी दैनिक’ लोकमंथन , शी बोलताना व्यक्त केले.

COMMENTS