माहूर प्रतिनिधी - आगामी संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किनवट विधानसभा मतदारसंघाचा सलग तीन पंचवार्षिक निर्विवाद नेतृत्व केलेले माजी आमदार प्र
माहूर प्रतिनिधी – आगामी संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किनवट विधानसभा मतदारसंघाचा सलग तीन पंचवार्षिक निर्विवाद नेतृत्व केलेले माजी आमदार प्रदीप नाईक सद्या पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी पक्ष बांधणीच्या कामाला लागले असून आपले ते आपलेच परंतु इतर पक्षातील ही कार्यकर्ते आपले करण्यासाठी मोठी इन्कमिंग सुरू केली आहे.हे माञ तेवढेच खरे असतांना मुद्दल सोडून व्याजाकडे लक्ष केंद्रित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनर खाली वाई बाजार ग्रामपंचायत मध्ये सलग दुसरा टर्म पूर्ण बहुमताने सत्ता उपभोगत असलेल्या सत्ताधार्यांना मात्र आता भाजपचे आमदार भिमराव केरामांचा लळा लागल्याने मागील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईकांचे गणित इचकवण्यामध्ये अशाच झारीतील शुक्राचर्यांचा हात होता की काय ? यावर संशोधन करण्याची वेळ माजी आमदार प्रदिप नाईक यांच्यावरच येऊन ठेपली आहे.
माहूर तालुक्यात लोकसंख्येची घनता व बाजारपेठ शिवाय राजकिय दृष्टिकोनातून वाई बाजार सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.कोट्यावधी रुपयाची उलाढाल असलेल्या ग्रामपंचायत मध्ये उत्पन्नाचे स्त्रोतही मोठ्या प्रमाणात असल्याने निवडणुकीतही तुलनेने तेव्हढाच खर्च करावा लागतो,वाई बाजार ग्रामपंचायत मध्ये निवडून येणारा सदस्य हा नगरसेवका पेक्षा कमी नाही अशी अंधश्रद्धा आहे.वाई बाजार ग्रामपंचायत चे बहुजनवादी धर्मनिरपेक्ष सरपंच आणि उपसरपंच परवा भाजपाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे दरम्यान आयोजित सभेच्या व्यासपीठावर होय मी सावरकर म्हणून विराजमान झाल्याने हा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.माजी आमदार प्रदीप नाईकांशी साख्य असलेले वाई बाजार चे उपसरपंच तथा जामा मस्जिद कमिटीचे सदर व अमीर हाजी उस्मान खान हे जणू एखादे शासकीय कार्यक्रम असल्यागत भाजपच्या धोरणात्मक पक्षीय कार्यक्रमाला मिरवत होते. सहाजिकच ही घटना आपसूकच घडली नाही तर गुत्तेदारी कामाच्या लालसेपोटी वाई बाजारचे उपसरपंच निष्ठावान आदिवासी सरपंच व सदस्यांनाही आपले स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी राजकारण्यांपुढे मुजरा करायला लावतात हे सर्वश्रुत आहेच,परंतु वाई बाजार येथील सावरकर गौरव यात्रेमधील ही घटना माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासाठी निश्चितच चिंता वाढवणारी ठरणारी आहे.मागील पंचवार्षिक व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनर व झेंड्याखाली निवडून आलेल्या पॅनलच्या हातात सत्ता आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच माजी आमदार प्रदीप नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून वाईबाजारकडे बघितले जाते,माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्व काळात कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामाच्या नावावर येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांवर उधळला,परंतु ते म्हणतात ना की घर फिरले की वासे ही फिरतात या म्हणीप्रमाणे ना प्रदीप नाईक पदावर आहेत ना त्यांचा पक्ष सत्तेवर अशा स्थितीत ’हम तुम्हारे है सनम’ म्हणत विद्यमान आमदार केरामांच्या विकास निधीच्या वाहणार्या गंगेत न्हाहून निघण्यासाठी वाई बाजार ग्रामपंचायत चे पदाधिकारी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटातील नारायण वाघ च्या भूमिकेत राजकीय क्षेत्रातील मातब्बरांना चुना लावण्याचा उद्योग करत आहेत.वाई बाजार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमी निम्म्यापेक्षा अधिक मतदान असते परंतु येथील गाव पुढार्यांचे गुत्तेदारी प्रेम पाहता प्रदीप नाईकाच्या घडीला केराच्या टोपलीत टाकून केरामांचा कमळ फुलविल्यास नवल नाही.कारण वाई बाजारच्या सरपंच,उपसरपंचाचे आमदार केराम प्रेम भाजपाच्या कमर्शियल कार्यक्रमातही उतु जात असल्याने प्रदीप नाईक यांना आपले निष्ठावान कोण आणि गद्दार कोण हे लवकरच तपासून घ्यावे लागेल अन्यथा एकीकडे पक्ष वाढीसाठी पक्ष प्रवेश सोहळे घेण्याचा सपाटा तर दुसरीकडे किल्ल्याला सुरुंग लागल्याने ऐन निवडणुकांच्या वेळेला मागे वळून बघितल्यास राष्ट्रवादीचा ढासळलेला बुरुज शिल्लक राहील अशी परिस्थिती परवाच्या सावरकर गौरव यात्रेवरून दिसून येत आहे.
COMMENTS