मुंबई प्रतिनिधी - बिग बॉस जिंकल्यानंतर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा 'एमसी स्टॅन'ची लोकप्रियता दुप्पट झाली आहे. साडेचार महिने चाललेल्
मुंबई प्रतिनिधी – बिग बॉस जिंकल्यानंतर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा ‘एमसी स्टॅन’ची लोकप्रियता दुप्पट झाली आहे. साडेचार महिने चाललेल्या या शोमधील एमसी स्टॅनची वेगळी शैली प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. हेच कारण होते की बिग बॉसमध्ये फारसे सक्रिय नसूनही चाहत्यांनी त्याची साथ सोडली नाही. आणि याच कारणामुळे एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात तीव्र स्पर्धा होती. अनेकांनी शिव हाच विजेता होणार अशी सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र, सलमाननं एमसी स्टॅनचा हात उंचावत त्याच्या नावाची घोषणा केली आणि सगळीकडे एमसी स्टॅनच्या नावाचा जयघोष सुरु झाला. एमसी स्टॅनचा सोशल मीडियावर स्वतः असा वेगळा चाहता वर्ग असून, बॉलिवूड कलारांमध्ये देखील त्याची प्रचंड क्रेज असल्याचं सतत दिसून येत असतं.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता एमसी स्टॅनचे एका पाठोपाठ एक अनेक रॅप शोजसुद्धा होणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे. या संदर्भातील एक ऑफिशल पोस्ट देखील एमसीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली असून, त्याच्या या शोजसाठी फॅन्स देखील उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. मात्र, त्यापूर्वीच एमसी स्टॅनने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये एमसी स्टॅनने त्याच्या रॅपचा तडका लावला. 4 आणि 5 मार्चच्या एपिसोडमध्ये एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक हे कपिल शर्माच्या शोमध्ये धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत. स्वतः कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडची एक झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये कपिलसुद्धा स्टॅनच्या रॅपवर थिरकताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन त्याच्या 80 हजार रुपयांच्या शूजमध्ये आणि लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. स्टेजवर एमसी स्टॅन रॅप गातोय आणि त्या रॅपच्या तालावर कपिल शर्मा नाचताना दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करताना कपिलने ‘क्या बोलती पब्लिक? वाइब है की नहीं? लव्ह यू ब्रो एमसी स्टॅन..” असं कॅप्शन देखील दिल आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फॅन्स देखील या शोची आतुरतेने वाट पाहत असल्याचं दिसत आहेत.
COMMENTS