Homeताज्या बातम्या

चायना मांजाने कापला पाच वर्षीय मुलीचा गळा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे स्वरा चाकणे ही पाच वर्षीय मुलगी तीच्या वडिलांसोबत मोटरसायकलवर जात असताना तीचा चाय

संगमनेरच्या उपकारागृहातून चार कैदी फरार
करमाळ्याचे आमदार यांनी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर काढलेले कोट्यवधी कर्ज l पहा LokNews24
कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे स्वरा चाकणे ही पाच वर्षीय मुलगी तीच्या वडिलांसोबत मोटरसायकलवर जात असताना तीचा चायना मांजाने गळा कापून ती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना 10 जानेवारी रोजी घडली. गोविंद वसंत चाकने हे राहुरी तालूक्यातील वांबोरी येथील रहिवाशी आहेत. त्यांची पाच वर्षीय मुलगी स्वरा गोविंद चाकने ही मुलगी राहुरी शहरातील त्यांचे नातेवाईक संजय गुलदगड यांच्याकडे आली होती.10 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान स्वरा व तीचे वडील मोटरसायकलवर वांबोरी येथे जात होते. दरम्यान राहुरी खुर्द येथेच माऊलाई मंदिरा समोर रस्त्याने जात असताना चायना मांजा स्वरा हिच्या गळ्याला अडकून कापला गेला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तीच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS