मुख्याधिकारी यांच्या नावाने लाच मागणारा लिपिक लाचलचुपतच्या जाळयात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याधिकारी यांच्या नावाने लाच मागणारा लिपिक लाचलचुपतच्या जाळयात

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेचा नाहरकत दाखला देण्यासाठी मुख्याधिकारी लांडगे यांच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या नगरपरिषद नगरचना विभागाच

मनसेच्या नांदगावकरांनी केला (स्व.) राठोडांच्या कार्याचा गौरव
श्री हरिहर केशव गोविंद भगवान यात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  
*SPECIAL REPORT: मा. आ. चरण वाघमारे यांचा सरकारला ‘१७० कोटींचा’ सल्ला | LokNews24*

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी नगरपरिषदेचा नाहरकत दाखला देण्यासाठी मुख्याधिकारी लांडगे यांच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या नगरपरिषद नगरचना विभागाचे लिपिक अंबादास साठे यांच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांना बिअर बार व परमिट रुम चा परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेला नगरपरिषदेचा नाहरकत दाखला मिळणे करिता नगरपरिषद पाथर्डी येथे अर्ज दिला होता.सदर अर्जावरुन नाहरकत दाखला देणे करिता यातील लिपिक अंबादास साठे याने मुख्याधिकारी लांडगे यांचे करिता म्हणुन पंचवीस हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.सदरील केलेल्या लाचेच्या मागणी पडताळणी मध्ये लिपिक साठे यांनी मुख्याधिकारी लांडगे यांचे नावाने पंचवीस हजार लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणून लिपिक अंबादास साठे (नगरचना विभाग,नगरपरिषद) यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार अधिनियम १९८८ च्या ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हरिष खेडकर, (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर) हे करीत आहेत. सदर कारवाई हरीष खेडकर, (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर) पुष्पा निमसे, (पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात पोलीस नाईक रमेश चौधरी, पो.अंमलदार रविंद्र निमसे,वैभव पांढरे,बाबासाहेब कराड,चालक पो ह.हरुन शेख, राहुल डोळसे.सुनील कडासने आदी जण सहभागी झाले होते. सदर घटनेतील पालिका वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS