Homeताज्या बातम्या

बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले

अहमदनगर/प्रतिनिधी ः लग्नासाठी पुणे येथे जाण्यास निघालेल्या वकिलाचे पाकीट पुणे बस स्थानकावर चोरीला गेले. या पाकिटात साडेसहा हजार रुपये रोख रक्कम व

अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी
कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी ः लग्नासाठी पुणे येथे जाण्यास निघालेल्या वकिलाचे पाकीट पुणे बस स्थानकावर चोरीला गेले. या पाकिटात साडेसहा हजार रुपये रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे होती. ही घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी 5 जानेवारी रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अब्दुलहमीद गुलाममुस्ताफ शेख (वय 71, रा. पांरशाखुंट, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अ‍ॅड. शेख हे 30 डिसेंबर रोजी पुणे येथे लग्नास जाण्यासाठी पुणे बस स्थानकावर आले होते. बसमध्ये बसत असताना गर्दी होती. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांना वाहकाने जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे शेख व त्यांच्या पत्नी बसमधून खाली उतरले. त्यानंतर फिर्यादी यांनी खिशातील पाकीट तपासले असता ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु त्यांना लग्नासाठी पुणे येथे जायचे असल्याने ते पुण्याला गेले. ते 4 जानेवारी रोजी नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी 5 जानेवारी रोजी फिर्याद दिली आहे. पाकीट चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS