Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संकलित कर थकबाकीचे पैसे आणा, नाहीतर दंडाला सामोरे जा…

मनपा आयुक्त डॉ. जावळेंनी दिली कर्मचार्‍यांना तंबी

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील 6 महिन्यांपासून संकलित कर थकबाकी वसुलीसाठी नेमणूक केलेली असतानाही कर्मचारी फक्त कारवाईचा देखावा करीत असल्याचे दिसून आल्

अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक
महापालिकेतील ‘प्रशासकराज’ कारवाईचा बडगा उगारणार का ?
अहमदनगर शहरातील विकास आराखडा आणि ओढ्या-नाल्यांचा प्रश्‍न

अहमदनगर/प्रतिनिधी ः मागील 6 महिन्यांपासून संकलित कर थकबाकी वसुलीसाठी नेमणूक केलेली असतानाही कर्मचारी फक्त कारवाईचा देखावा करीत असल्याचे दिसून आल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ज्या कर्मचार्‍यांची वसुली 20 टक्केपेक्षा कमी झाली आहे त्यांना 5 हजारांचा व ज्यांची 30 टक्क्यांपेक्षा कमी वसुली आहे त्यांना 3 हजारांचा दंड करण्याचे आदेश वसुली विभागाला दिले आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत थकीत कराची 100 टक्के वसुली झाली नाही तर अधिक कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मालमत्ता कर वसुलीबाबतची आढावा बैठक आयुक्त जावळे यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, कर संकलन अधिकारी व्ही.जी.जोशी यांच्यासह प्रभाग अधिकारी व वसुलीसाठी नेमलेले कर्मचारी उपस्थित होते. वसुलीचा आढावा घेताना सर्वच ठिकाणी असमाधानकारक वसूल असल्याचे आढळून आल्याने आयुक्त जावळे संतापले. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांनी समाधानकारक कामगिरी न केल्याने अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

अनधिकृत नळकनेक्शन शोधून त्या नागरिकांवर कारवाई करा. येत्या मार्च अखेरपर्यंत थकीत मालमत्ता कराची 100 टक्के वसुली झाली पाहिजे. महापालिका ही तुमची आहे, पण जर ती तुम्हाला आपली वाटत नसेल तर आता कोणाचीही गय केली जाणार नाही. जे कर्मचारी कामचुकारपणा करताना आढळतील, त्यांच्यावर कारवाईचे अधिकार प्रभाग अधिकार्‍यांना आहेत. त्यांनी ती करावी. अन्यथा, मला प्रभाग अधिकार्‍यांवरच कारवाई करावी लागेल, असाही इशारा आयुक्त डॉ.जावळे यांनी दिला. महापालिका हद्दीतील अनेक ओपन प्लॉटधारक वर्षानुवर्षे महापालिकेकडे मालमत्ता कर भरीत नाहीत. त्यामुळे पुढील 15 दिवसांत अशा लोकांना नोटीसा द्या. त्यांनी थकबाकी भरली नाही तर तातडीने त्या-त्या भागातील तलाठी कार्यालयात जावून या ओपन प्लॉटवर मनपाचे नाव लावण्याची कार्यवाही करावी. जे कर्मचारी यात कामचुकारपणा करतील त्यांच्यावर महापालिकेचे नुकसान केले म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त डॉ.जावळे यांनी दिला.

COMMENTS