Homeताज्या बातम्या

कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार

मुंबई/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा गायरान जमीन घोटाळा, टीईटी प्रकरण आणि कृषी महोत्सवप्रकरणी 15 कोटी वसुलीचे टार्गे

गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात

मुंबई/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा गायरान जमीन घोटाळा, टीईटी प्रकरण आणि कृषी महोत्सवप्रकरणी 15 कोटी वसुलीचे टार्गेट कृषी विभागाला दिल्याचा आरोप करत विरोधकांनी मंत्रिमंडळातून सत्तार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणाची थेट सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे तक्रार दाखल झाल्यामुळे कृषीमंत्री सत्तार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 शेतकर्‍यांची 1400 पानी तक्रार सीबीआयकडे केली होती. या तक्रारीत 200 शेतकर्‍यांच्या जमिनीचे पुरावे दिल्याचा दावा केला आहे. तसेच 28 मुद्द्यांवर सत्तार यांच्या संपत्ती चौकशीची मागणी केली आहे. कथीत गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळ्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाला आहे. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

COMMENTS