Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गंगापूररोड येथील सागर स्वीटच्या कार्यालयात घरफोडी करणाऱ्या चोराला अटक 

नाशिक प्रतिनिधी - नाशिकच्या गंगापूररोड येथील सागर स्वीटच्या कार्यालयात घरफोडी झाल्याची घटना समोर आली होती.या घटनेत चोरट्यांनी अंदाजे तब्बल 35 लाख

इस्लामपूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक लाचलूचपतच्या जाळ्यात
धर्मांतर बंदी कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
व्यापार्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री ना.भारती ताई पवार यांची घेतली भेट.

नाशिक प्रतिनिधी – नाशिकच्या गंगापूररोड येथील सागर स्वीटच्या कार्यालयात घरफोडी झाल्याची घटना समोर आली होती.या घटनेत चोरट्यांनी अंदाजे तब्बल 35 लाख रुपये चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी cctv च्या आधारे संशयितांचा शोध घेत एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 22 लाख 77 हजार रुपये गुन्हे शाखा १ च्या पथकाने हस्तगत केले आहे. सागर स्वीट येथे आधी काम करत असलेले व काम सोडून गेलेल्या कामगारांची चौकशी केली असता दुकानातील काम सोडून गेलेला उत्तर प्रदेश येथे राहणारा कामगार संशयित विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वरप्रसाद  याने त्याच्या साथीदारांसह उत्तर प्रदेश येथून येऊन सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा १ च्या पथकाने उत्तरप्रदेशातील बाराबंकी येथून संशयित अखिलेशकुमार मनिराम याला ताब्यात घेत त्याकडून सागर स्वीट येथील घरफोडीतील चोरी केलेले 22 लाख 77 हजार रुपये हस्तगत केले असून इतर साथीदारांचा शोध सुरू असून आणखी एक संशयित हा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

COMMENTS