युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 

आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी : युवक हि देशाची संपत्ती असून युवकांचे आरोग्य निरोगी व शरीर सुदृढ राहावे यासाठी कोपरगाव मतदार संघातील युवकांच्या मागणीवरून अनेक गाव

पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा
जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न ः आ. आशुतोष काळे
मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.

कोपरगाव प्रतिनिधी : युवक हि देशाची संपत्ती असून युवकांचे आरोग्य निरोगी व शरीर सुदृढ राहावे यासाठी कोपरगाव मतदार संघातील युवकांच्या मागणीवरून अनेक गावात जिम साहित्य दिले असून या जिम साहित्याचा फायदा घेवून युवा वर्गाने शरीर सुदृढ व निरोगी बनवावे असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे(Ashutosh Kale) यांनी दिला आहे. पैलवानांचे माहेरघर असलेल्या कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावातील युवकांच्या मागणीवरून आ. आशुतोष काळे यांनी बंदिस्त जिम साहित्य दिले. या जिमच्या साहित्याचे लोकार्पण नुकतेच त्यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी तरुणाईशी संवाद साधतांना ते बोलत होते.
ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात दिवसाचे 24 तास सुद्धा कमी पडत असून प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे तरुणाईचे शरीराकडे थोडेसे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध नोकरीच्या भरतीवेळी शारीरिक तंदुरुस्तीच्या नियमात न बसल्यामुळे नोकरीच्या संधीला मुकावे लागते. त्यामुळे युवा वर्गाने जिमच्या साहित्याचा पुरेपूर फायदा घेवून आपली शरीर संपत्ती कमवावी जेणेकरून करिअरच्या संधी हातातून जाणार नाही. युवा वर्गाच्या मागणी वरून जिम साहित्य दिले असून युवकांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याचे उपस्थितांना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. जिमचे साहित्य मिळाल्यामुळे शिंगणापूरच्या नवयुवकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी सचिन संवत्सरकर, चेतन संवत्सरकर व दीपक बोरुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चांगदेव आगवन, जालिंदर संवत्सरकर, संजय संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, अनिल कुर्‍हे, घनश्याम कुर्‍हे, लाला आजगे, गणपत विधाटे, सुरेश संवत्सरकर, विठ्ठल संवत्सरकर, बापू संवत्सरकर, देविदास कुर्‍हे, कैलास कुर्‍हे, सुनील कुर्‍हे, सचिन उंडे, अरविंद संवत्सरकर, पवन गिते, सचिन संवत्सरकर, देविदास आढाव, कुणाल आढाव, बाळासाहेब आढाव, प्रशांत संवत्सरकर, आदेश संवत्सरकर, तेजस संवत्सरकर, मनोज संवत्सरकर, विलास आजगे, अक्षय आढाव, ओम आढाव, संकेत आढाव, आदित्य इंगळे, कृष्णा संवत्सरकर, गणेश इंगळे, सागर संवत्सरकर, किरण लोणारी, अक्षय महाजन, राजु महाजन, आकाश कुर्‍हे, संदीप गायकवाड, युवराज कुर्‍हे, चेतन संवत्सरकर, आदेश कुर्‍हे, अण्णासाहेब कुर्‍हे, अशोक आढाव, अच्युत कुर्‍हे, राजेंद्र संवत्सरकर, गेणू संवत्सरकर, सचिन लगड, कुणाल संवत्सरकर, अर्जुन कुर्‍हे, किरण संवत्सरकर, भाऊसाहेब संवत्सरकर, प्रेम संवत्सरकर, रामदास संवत्सरकर, नितीन संवत्सरकर, नितीन कुर्‍हे, सुनील संवत्सरकर, ग्रामसेवक दिलीप वारकर, कॉन्ट्रॅक्टर अल्ताफ हुसेन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS