Homeताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा

सातारा / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे, ता. महाबळेश्‍वर दौर्‍यावर आहेत. त्यांनी महाबळेश्‍वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्

श्रीकृष्ण जीवनचरित्र सृष्टांची बाजू सांगणारे चिरंजीवचरित्र
गेवराई येथे श्रीराम जन्मोत्सव उत्सव उत्साहात साजरा
चंद्रपुरमध्ये दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे, ता. महाबळेश्‍वर दौर्‍यावर आहेत. त्यांनी महाबळेश्‍वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला.
दरे, ता. महाबळेश्‍वर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांची माहिती दिली. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख उपस्थित होते.
ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना आणखीन चांगल्या वाढीव सुविधा निर्माण कराव्या. तसेच महाबळेश्‍वर, पाचगणी व्यतिरीक्त क वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे क वर्ग पयर्टन स्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करावा. जिल्ह्यात विविध यात्रा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रा व उत्साहांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यांच्या सुविधेसाठी ही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ना. शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS