Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील एका शेतकर्‍यांने प्रोत्साहन अनुदान जमा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व माजी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 95 टक्के मतदान
डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू
सातारा येथील रयतच्या मुख्य कार्यालयासमोर बदलीग्रस्त शिक्षकांचे आंदोलन

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील एका शेतकर्‍यांने प्रोत्साहन अनुदान जमा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व माजी खा. राजु शेट्टी याचे एकत्रितपणे एकदम ओके 50 हजार रुपये जाहीर आभाराचे बँनर झळकाताच शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा तालुक्यात सुरु आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेग्युलर कर्जधारकांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याचे कबूल केले होते. सरकार जात असताना घाई गडबडीत यांची घोषणा करण्यात आली होती. माजी खा. राजू शेट्टी यांनी परिक्रमा परिक्रमा पंचगंगेची ही यात्रा प्रयाग चिखली ते नरसिंहवाडी ही दिडशे किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढूनही सरकार दखल घेत नव्हते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने 150 रूपये प्रती गुंठा देऊन पुरग्रस्ताच्या जखमेवर मीठ चोळले होते.
त्यानंतर भरपावसात कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याची शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीच्या पुर्वी आनुदान जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. कालपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. यामुळे माजी खा. राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले आहे.

COMMENTS