Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा

पंढरपुर प्रतिनिधी - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू
सोलापूरात तापमाण चाळीशी पार
शंभर फूट रस्त्याचे भिजत घोंगडे अद्यापही कायम

पंढरपुर प्रतिनिधी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा लाडू प्रसाद हा निकृष्ट असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. साल २०२१-२०२२ या वर्षामध्ये एका महिला बचत गटाला लाडू प्रसाद तयार करण्याचे काम देण्यात आले होते. या बचत गटाकडून निकृष्ट पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात आला होता. असा लेखापरीक्षण अहवाल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला आहे.स्वच्छता न राखणे, लाडूची पॅकिंग व्यवस्थित न करणे असा ठपका अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते. निकृष्ट दर्जाचा लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.पंढरीला येणारा प्रत्येक वारकरी विठुरायाच्या चरणी आशिर्वाद घेतल्यावर प्रसादाचा लाडू घेत असतो. हा लाडू विठुरायाचा प्रसाद आणि आशिर्वाद आहे, असं भाविक समजतात आणि श्रद्धेने लाडू खातात. मात्र प्रसादाच्या लाडूमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं लेखापरीक्षण अहवालात म्हटलं आहे. सध्या नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा एक वर्षाचा (२०२०-२१) लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. त्यावेळी ही माहिती समोर आलीये.

COMMENTS